मागच्या आठवड्यात श्री. भास्कर लिमये लिखीत "नर्मदे हर..... हर नर्मदे" हे पुस्तक वाचायचा योग आला.

श्री. लिमये आपल्यासारखेच एक सर्वसाधारण व्यक्तीमत्व.
"Bank Of India" मध्ये नोकरी करुन सेवानिवत्त झालेले... त्यांच्या मनात अगदी लहानपणीच गोनिदांचे "कुणा एकाची भ्रमणगाथा" हे पुस्तक वाचुन पायी नर्मदा परिक्रमा करायची इच्छा निर्माण झाली...नोकरीत असेपर्यत त्यांना ते जमले नाही...पण नंतर मात्र त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे त्यानी हे शक्य करुन दाखवले.

या पुस्तकात नर्मदा परीक्रमा बरीच खोलात जाऊन समजावून सांगितली आहे...
फ़क्त परिक्रमेचा रस्ताच नव्हे तर परीक्रमा म्हणजे काय, नर्मदा परीक्रमा का करावी, गंगेसारख्या पुरातन नदीची किंवा इतर कुठ्ल्या नदीची परीक्रमा का करत नाहीत , परीक्रमेदरम्यान सांभाळायची काही पथ्य/नियम, परीक्रमेसाठी केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी अशा सर्व वि‌‍षयांकडे लेखकाने आपले लक्ष वेधले आहे.

oveall पुस्तक खूप छान आहे. पुस्तक वाचताना आपण पण लेखकाबरोबर परिक्रमा करत आहोत असा भास होतो. परीक्रमे दरम्यान आलेल्या अडचणी, त्यांचे नर्मदा मय्याने केलेले निवारण, काही खरोखरच चमत्कार वाटाव्या अशा घटना, १२ जणांच्या group मध्ये फक्त लेखकाची पूर्ण झालेली परीक्रमा, पुनीसाच्या जंगलात अश्वत्थाम्याची पडलेली गाठ ह्या सगळ्या गो‍ष्टी खरोखरच भान हरपून टाकणा-या आहेत.

पुस्तक वाचुन खाली ठेवले की आपल्या मनात लेखकाबद्दल कौतुक आणि नर्मदा परीक्रमेचे कुतुहल मात्र जागे होते आणि मग आपण पण नकळत म्हणतो.... नर्मदे हSSSर हSSSर.