"मी रोज पहाटे ४ वाजता उठतो. तुम्ही दुपारी १२ वाजता जेवता ना, तसेच मी पहाटे जेवतो. मग सकाळी ६ ला cricket खेळायला जातो. ६ ते ९ practice करतो. मग सकाळी ९ ते रात्री ९ office. ९ नंतर ११ वाजेपर्यन्त तोच local चा धक्काबुक्कीचा परतीचा प्रवास. ११ वाजता dombivali ला परत. Home sweet home.
रात्रीचे जेवण झाले की १२ ते ४ शांत झोप. परत दुसरे दिवशी ४ वाजता दिवस सुरु."

वाचुन आश्चर्य वाटतय ना? किती busy schedule हे? आणि फ़क्त ४ तास झोप? कोणी तरी युक्तीवाद करेल की "काही काही माणसांना थोडी झोप पण पुरते हो" . जरा थांबा ना... खरी मजा तर पुढेच आहे. ह्या माणसाच्या heartbits किती असतील मिनिटाला?

पण ह्या दोन गोष्टींचा काय संबंध एकमेकांशी? गोंधळलात?
One minute please........

मि. प्रकाश वेलणकर. अतिशय सर्वसाधारण माणुस. अगदी तुमच्या-आमच्या सारखाच. जबरदस्त cricket fan. स्वत: उत्तम cricket खेळतात सुध्दा.
पण एका रात्री अचानक star बनले. कशामुळे? तर त्यांच्या heartbits मुळे.

त्याचे झाले असे, निरोगी माणसाच्या heart bits मिनिटाला ७०-८० असतात. जर त्या कमी झाल्या तर धाप लागणे, चक्कर येणे, खुप झोप येणे असे प्रकार घडु शकतात, आणि वेळीच उपचार नाही झाले, तर काही खैर नाही त्या माणसाची!!

मात्र वेलणकर साहेब ह्या सगळ्याला अपवाद आहेत. त्यांचे heartbits दिवसाला २९-५० पर्यंत कितीही असतात. पण त्याहुन अधिक मात्र कधीच नाहीत, आणि गंमत म्हणजे त्यांना वरचा कुठलाच त्रास होत नाही. त्यांची तब्येत एकदम ठणठणीत. ऎवढेच नाही तर ते आपल्या सगळ्यांहुन जास्त fit आहेत.

जेव्हा doctor ना ह्या सगळ्या गोष्टींचा पत्ता लागतो, तेव्हा अतिशय निरोगी असुनही वेलणकराना कुठ्ल्या
गोष्टींना सामोरे जावे लागते, कुठ्ल्या tests कराव्या लागतात, त्यावेळची त्यांची, त्यांच्या कुटुंबियांची झालेली मन:स्थिती ह्या सगळ्याचा वेलणकरांनी आपल्या "32 HeartBits" ह्या पुस्तकात अतिशय खुमासदार भाषेत आढावा घेतला आहे. serious गोष्ट असुनही "Doctor, अहो माझा प्रेमविवाह आहे, त्यामुळे माझे निम्मे HeartBits माझ्या बायकोकडे असतील कदाचित. तुम्ही एकदा check करुन बघा" यांसारखे त्यांना सुचणारे विनोद तर केवळ अफ़लातुन. सगळ्या tests करुन झाल्यानंतरही जेव्हा doctor ना त्यांच्यात काहीच दोष आढळत नाही तेव्हा त्यांना झालेल्या आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. पुस्तक अतिशय उत्कंठावर्धक आहे. वाचुन संपेपर्यंत खाली ठेववत नाही आणि राहुन राहुन नवल वाटत राहते ते वेगळेच!

वैद्यकशास्त्राच्या द्रुष्टीने एक चमत्कार, आधुनिक विज्ञानाला पडलेले एक कोडे आणि आपल्या सर्वांसाठी अगदी शब्दश: "एक जगावेगळा माणुस" .................... मि. प्रकाश वेलणकर!!
वेलणकरांना असेच दीर्घायु लाभावे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना!!