" रूपाली रेपाळे", जन्माने तुमच्या-आमच्या सारखीच सामान्य, पण स्वकर्त्रुत्वाच्या जोरावर genis book पर्यंत मजल मारलेली. आई-वडील-भाउ अशा चाकोरीबध्द आयुष्य जगत असतानाच पोहायला शिकली आणि या पाण्याने तिचे अवघे आयुष्यच बदलुन गेले.
धरमतर ते gateway of India हा ३८ नौटिकल किलोमीटर्सचा प्रवास ... ज्यामध्ये अन्दाजे ८-१० हजार रुपये खर्च अपे़क्षित असतो, तो तिने वयाच्या केवळ १२ व्या वष्री पूर्ण केला.
त्यानंतर मात्र जगात जे ६ मोठे channels आहेत, ते रुपालीने लहान वयातच पार करावेत असे तिच्या वडिलाना वाटु लागले.
channel म्हणजे ज्याच्या २ किना-यावर २ वेगवेगळे देश वसलेले आहेत असा प्रदेश. सुरुवात झाली ती "English Channel" ने.
हे Channels पार करायचे तर world swimming association चे काही संकेत असतात.
सतत पोहुन swimmer च्या अंगातली चरबी जळत असते. तसे होउन शेवटी फ़क्त हाडाचा सापळा उरु नये, त्याला T.B. सारखे आजार होउ नयेत यासाठी वजन ४२ किलो तरी पाहिजेच! ह्या Channel मध्ये तिन्ही ऋतु एकाच वेळी अनुभवायला मिळतात आणि तेही अगदी तीव्रतम!! म्हणुन swimmer च्या शरीराचे तापमान किमान पाण्याच्या तापमानाईतके तरी पाहिजे. पोहताना कधीही ते कमी झाले तर association कोणत्याही क्षणी ते पोहणे रद्द करु शकतात. याशिवाय प्रवास, राहणे, जेवण-खाण या सगळ्याचा मिळुन खर्च २-३ लाख!!
English channels पार करताना १ observer boat बरोबर असणार, जी दर तासाने ग्लुकोजपाण्याचा एक घोट आणि cadbury चा लहान चौकोन swimmer कडे फ़ेकणार. त्यांना swimmer च्या शरीराला स्पर्श करायला परवानगी नाही.
"English Channel" च्या एका बाजुला England मधले "Dover" हे गाव, तर दुस-या बाजुला France मधले caley हे ठिकाण.
आजपर्यंत गेल्या १०० वर्षात केवळ ४५० पैकी १८ भारतीय लोकांना हे यश मिळाले आहे. पण रुपालीने सतत १६ तास ७ मिनीटे पोहुन ही कामगिरी शक्य करुन दाखविली. She became the first Indian girl to swim against the reverse current and achieve the world record.
English Channel नंतर नंबर लागला तो जिब्राल्टरचा.मोरोक्को ते स्पेन हे अंतर २८ नाँटिकल किलोमीटर. पण English Channel पार केलेल्या रुपालीला यात काहीच कठीण वाटले नाही. दोन्ही देशांच्या naval अधिका-यांच्या उपस्थितीत तिने ही खाडी केवळ ७ तासात पार केली. त्या वेळी तिचे वय होते फ़क्त १२ वर्ष!!
यानंतर धरमतर double. म्हणजेच Gate way of India ते धरमतर. तिथे १५ मिनिटे पाण्यात विश्रांती आणि परत धरमतर ते Gate way. १३ वर्ष वय असलेल्या रुपालीने दुपारी ४ ला पोहायला सुरुवात केली आणि दुसरे दिवशी दुपारी २:३० वाजता परत Gate way गाठल, जवळजवळ २४ तास पाण्यात.
English Channel, जिब्राल्टर आणि धरमतर double नंतर रुपालीला वेध लागले ते श्रीलंकेच्या पाल्क सामुद्रधुनीचे. या समुद्रात विषारी सापांची खुप भिती असते तसेच तामीळ वाघपण कधीही हल्ला करु शकतात. सुरक्षेचे उपाय म्हणुन १ pilot boat आणि १ coast guard boat बरोबर होती. त्या पायलट बोटीच्या दिव्याच्या आधारावर हे सगळे अंतर कापायचे होते. रुपालीने हे अंतर ११ तासात पार केले. ही खाडी पोहणारी ती पहिली महिला बनली.
Australia मधील bass strait, ज्यालाच Philips Bay म्हणुन पण ओळखतात. याच्या दोन्ही किना-यामधे ७५ नाँटिकल किलोमीटर अंतर आहे. पण या समुद्रामध्ये शार्क मासे खुप मोठ्या प्रमाणावर असतात म्हणुन ईथे cage swimming करावे लागते. पोहणा-या माणसाच्या उंचीपेक्षा थोडा मोठा धातुचा पिंजरा बनवतात, swimmer ने यात पोहायचे. ४-५ strokes मधे swimmer पिंज-याच्या पुढच्या टोकाला आला की pilot बोटीतल्या लोकांनी पिंजरा पुढे ओढायचा आणि मग परत पोहायचे. या पिंज-यांवर हात पाय मारुन मारुन असंख्य जखमा होतात आणि त्यात खारट पाण्यात पोहणे. एकवेळ साधे पोहणे सोपे पण हे म्हणजे भलतेच अवघड. पण रुपाली मागे हटणा-यातली नव्हती. तिने १७ तासात ही खाडी केवळ १४व्या वर्षी पार केली.
आता उरली होते ते फ़क्त, New zealand चे cook strait. New zealand च्या south irland आणि North irland दरम्यान असलेली खाडी म्हणजेच cook strait. एकुण अंतर २८ नाँटिकल किलोमीटर . एरवी हे पार करायला रुपालीला ५ तास सहज पुरले असते. पण ५-१० नाँटिकल miles ने वाहणा-या वा-याचा वेग ३२ नाँटिकल miles एतका प्रचंड वाढला. ह्या वा-यात कोणी सजीव पाण्यात तरंगु शकेल ह्यावर एरवी कोणी विश्वास पण ठेवला नसता, पण एथे तर ही चक्क पोहत होती. BBC ला ह्या घटनेची माहिती कोणीतरी दिली. त्यांनी ह्याचे घटनास्थळावर जाउन चित्रीकरण केले. ५-६ तासात पर होणारी ही खाडी पार करायला रुपालीला तब्बल २० तास लागले. But she did it finally!!!
पोहुन समुद्र संपले....जगातल्या ६ प्रसिध्द खाड्या पहिल्याच प्रयत्नात पार करणारी रुपाली पहिली महिला ठरली. आजपर्यंत अनेक सन्मान तिच्या पदरात आले पण ते केवळ अथक प्रयत्नांच्या जोरावर!!!
0 comments:
Post a Comment